Thursday, February 23, 2017

नल  दमयंती  स्वयंवर हे मराठीतील काही महत्वाच्या प्राचीन साहित्यापैकी एक आहे. या प्राचीन  काव्याचे लेखक श्री रघुनाथ पंडित आहेत. उपलब्ध माहितीनुसार या काव्याचा कर्ता शिवकालीन असून त्याचा राजदरबाराशी जवळचा संबंध होता व त्याला संस्कृत, फार्शी अरबी भाषांचे उत्तम ज्ञान होते. 
नल दमयंती स्वयंवर या काव्याची जितकी उपलब्ध हस्तलिखिते आहेत त्यात सर्व ठिकाणी या काव्याचे नाव एकच नाही. काही ठिकाणी  नल दमयंती स्वयंवराख्यान, दमयंती स्वयंवर, नल दमयंती आख्यान  असेही सापडते.   
प्रस्तुत काव्य नल राजा व दमयंती राजकन्या यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे. दमयंती ही विदर्भाच्या भीमक राजाची अतिशय सुंदर व उपवर अशी कन्या. ती एकदा दरबारात आपल्या पित्याजवळ असता काही ब्राह्मण तेथे आले व 'लोकी-नसे नलमनस्तुलना विलोकी' असे उद्गार काढून नल राजाची स्तुती केली. दमयंतीने नल  राजाला करण्याचा निर्णय घेतला. नलाच्या दूतांनी ही बातमी त्याच्यापर्यंत पोहोचवली. दमयंतीचे वर्णन ऐकून नल राजा बेचैन झाला. त्याने एका सुवर्णमय कांती असलेल्या हंसावर दमयंतीचे मन अनुकूल करण्याचे कार्य सोपविले. पुढे नल राजाशिवाय अन्य कोणत्याही पुरुषास  मी वरणार नाही असा निर्धार केला व पुढे नल दमयंतीचा विवाह थाटात साजरा झाला. 

No comments:

Post a Comment