Monday, April 10, 2017


शार्दूलविक्रिडित 
पुण्यश्लोकनृपावलींत पहिला होवोनि जो राहिला ।
जो राजा असता समस्त महिला, विश्रांती शेषाहीला ।।
व्यासोक्तें अवगाहीला बुधगांनी नानागुणीं गायिला ।
जो नामें तत्कथ ओघ लिहिला तो पाहिजे पहिला ।।
ज्याचे यश पवित्र आहे असा (नल ) राजा राजांच्या मालिकेत पहिला (अग्रगण्य) होता. जो राजा असता पृथ्वीला त्याचा भर होत नव्हता (शेष नागालाही भार होत नव्हता). व्यास ऋषींनी ज्याचे अनेक गुण गायले. जो नावाने नल आहे त्याबद्दल कथेच्या ओघात पहिल्यांदा  लिहिले पाहिजे. 

No comments:

Post a Comment